आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Irrfan Khan Will Star Opposite Aishwarya Rai Bachchan In Jazbaa

'जज्बा'मध्ये ऐश्वर्याचा को-स्टार असेल इरफान खान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिर्घकाळाचा ब्रेक घेतल्यानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत असेलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला एक अनोखा जोडीदार मिळाला आहे. संजय गुप्ताच्या 'जज्बा'मधून पुनरागमन करणा-या ऐश्वर्यासह या सिनेमात अभिनेता इरफान खान दिसणार आहे. सिनेमात ऐश्वर्या एक वकिलाचे पात्र साकारणार असल्याची चर्चा आहे. तसेच, इरफान पोलिस अधिका-याच्या भूमिकेत दिसेल.
सिनेमाचे शूटिंग लवकरच सुरु होणार असल्याचे कळते. सिनेमातील या भूमिकेसाठी ऐश्वर्याने वजन कमी केले आहे. या सिनेमातील जॉन अब्राहम ऐश्वर्यासह दिसणार असल्याच्या अफवा होत्या. मात्र आता इरफान खानचे नाव समोर आल्यानंतर या अफवांना पूर्णविराम लागला आहे.