(बॉलिवूड अभिनेता इरफान खान)
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड वर्तूळात इरफान खानच्या आगामी सिनेमाची चर्चा रंगत आहेत. परंतु सिनेमाचे शिर्षक ठरले नसल्याने काहीच स्पष्ट होऊ शकत नव्हते. आता बातमी अशी आहे, की सिनेमाचे शिर्षक 'मदारी' असल्याचे बोलले जात आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर अरविंद
केजरीवाल आणि त्यांच्या पार्टीचे काही क्षण झळकणार आहेत.
सोशियो पॉलिटीकल ड्रामावर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन 'फोर्स'चा दिग्दर्शक निशिकांत कामत करणार आहे. सिनेमामध्ये इरफान दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री
अरविंद केजरीवाल यांच्या भूमिकेत दिसणार आहे. एक सामान्य माणसाची भ्रष्टाचारच्या विरोधात असलेली लढाई सिनेमात दाखवणार आहे. इरफानशिवाय या सिनेमात जिम्मी शेरगिलसुध्दा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'मदारी' सिनेमा हैदराबाद, राजस्थान, दिल्ली, देहरादून, शिमला आणि शिल्लक शेड्यूल मुंबईमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. मदारीव्यतिरिक्त इरफान खानचा 'हैदर' आणि 'वेलकम टु कराची' हे सिनेमेसुध्दा रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हैदर'मध्ये इरफान खानचा लूक...