आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Is Aamir Khan Helping Salman Khan To Promote Ek Tha Tiger

आमिरची भविष्यवाणी, 'सलमानचा सिनेमा सुपरहिट होणारच' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिन्यात सलमान खानने आमिर खानच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाचे गोडवे गायले होते. आता आमिर खान सलमानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचे गोडवे गातांना दिसतोय.
गेल्या महिन्यात सलमान चॅरिटेबल क्लोथ लाईन बीईंग ह्युमनच्या प्रचारासाठी दुबईला गेला होता. तेथे एका पत्रकार परिषदेत पत्रकारांनी सलमानला आमिरच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमाबद्दल विचारले असता सलमानने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला.
सलमानने म्हटले की, ''मला आमिरवर गर्व आहे. तो आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगले काम करतोय.'' एका एपिसोडनंतर तर सलमानने ट्विटरव ट्विट केले होते की, ''वाह यार आमिर खान, टीलू (अंदाज अपना अपनामध्ये आमिरच्या व्यक्तीरेखेचे नाव टीलू होते) तू तर कमालच केले.''
आता आमिरने सलमानवर स्तुतीसुमने उधळली आहेत. आमिरने म्हटले की, ''मी अद्याप 'एक था टायगर' पाहिलेला नाही. मात्र चित्रपटाचे प्रोमो मला खूप आवडले. हा एक सुपरहिट सिनेमा ठरेल असे मला वाटते. मी सलमान, कबीर आणि आदि (आदित्य चोपडा) यांना मेसेज करुन प्रोमोज आवडल्याचा सांगितले.''
सुपरफिट आमिर खान
सत्यमेव जयतेचा परिणाम : आमिर खानची सरकारबरोबर २०० कोटींची डील ?
आमिर आणि काजोल एकत्र चित्रपट का करत नाहीत ?