आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लग्नाच्या दोन महिन्यांतच वर्तवली जातेय शक्यता, प्रेग्नेंट आहे राणी मुखर्जी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो: रानी मुखर्जी
मुंबई - ब-याच दिवसांनी बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी तिच्या आगामी 'मर्दानी' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी मीडियासमोर आली. या कार्यक्रमानंतर राणीची लेटेस्ट छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल झाली असून मुंबईतील फिल्मी आणि सामाजित वर्तुळात राणी प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे.
'मर्दानी'च्या ट्रेलर लाँचवेळी राणीने उपस्थितांचे लाडूने तोंड गोड गेले. आता पुढील आनंदाचे लाडू कधी देणार? असा प्रश्न विचारल्यानंतर राणी म्हणाली, की ''पुढील आनंदात लाडूसोबत सोंदेशसुद्धा खाऊ घालेल.'' म्हणजे लवकरच राणी सोंदेशसुद्धा लोकांना खाऊ घालणार अशी चिन्ह दिसू लागली आहेत, असे म्हणायला हरकत नाही.
यशराज बॅनरचा सर्वेसर्वा आदित्य चोप्रासोबत गुपचुप लग्न थाटण्यामागेसुद्धा हेच कारण असल्याचे म्हटले जात आहे. राणीने 21 एप्रिल 2014 रोजी इटलीत आदित्य चोप्रासह गुपचुप लग्न केले. लग्नानंतर केवळ दोनच कार्यक्रमांमध्ये राणीचे दर्शन घडले. लग्नानंतर पहिल्यांदा ती 30 मे रोजी तिच्या सासूबाईंच्या नवीन स्टोअर ओपनिंग कार्यक्रमात पोहोचली आणि दुस-यांदा तिचे दर्शन आगामी 'मर्दानी' या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी घडले.
लग्नाच्या दोन महिन्यांत केवळ दोनदा पब्लिक अपिअरन्स देणा-या राणीविषयी ती प्रेग्नेंट असल्याची अफवा आहे. आता यावर ती काय स्पष्टीकरण देणार, हे पाहावे लागेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लग्नानंतर केव्हा-केव्हा राणी मीडियापुढे आली...