आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GOOD NEWS : \'खल्लास गर्ल\' ईशा कोप्पिकरला कन्यारत्न प्राप्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री ईशा कोप्पिकर आपल्या वेडिंग रिसेप्शनवेळी पती टिम्मी नारंगसह)
मुंबई - बॉलिवूमध्ये खल्लास गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री ईशा कोप्पिकरच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ईशाने अलीकडेच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ती मुंबईतील सबबर्न हॉस्पिटलमध्ये दाखल असून आई आणि बाळ दोघेही सुखरुप आहेत. तिचे हे पहिलेच बाळ आहे. मुलीच्या जन्मानंतर तिचे पती टिम्मी यांनी ट्विट केले, "Yet another woman in my life! Isha and my baby girl are doing fine. We will decide on her name Tomorrow".
ईशा कोप्पिकरने 29 नोव्हेंबर 2009 मध्ये व्यावसायिक टिम्मी नारंगसह लग्न केले. लग्नापूर्वी ईशा दहा वर्षे बॉलिवूड अभिनेता इंदर कुमारसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. मात्र त्यांच्या नात्याचे रुपांतर लग्नात होऊ शकले नव्हते. इंदर कुमारसह ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री प्रिती झिंटाने ईशाची भेट टिम्मी नारंग यांच्यासह करुन दिली. कालांतरकाने या दोघांनी आपल्या मैत्रीच्या नात्याचे रुपांतर लग्नात केले.
तामिळ सिनेमाद्वारे केले पदार्पण...
ईशाने 1998 मध्ये 'काढल कविताई' या तामिळ सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 2000 मध्ये 'फिजा' या सिनेमाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिच्यासह करिश्मा कपूर आणि हृतिक रोशन मेन लीडमध्ये होते.
ईशाने हिंदी आणि तामिळसह तेलगू, मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मराठीत अलीकडेच तिचा मात हा सिनेमा रिलीज झाला होता. हा तिचा पहिलाच मराठी सिनेमा होता. 2013 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला. ईशाने अनेक सिनेमांमध्ये आयटम नंबरसुद्धा केले आहेत. 'डॉन', 'एक विवाह ऐसा भी', 'सलाम-ए-इश्क', 'क्या कूल हैं हम' आणि 'हम तुम' हे ईशाचे काही निवडक गाजलेले सिनेमे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ईशा आणि टिम्मी यांच्या लग्नाची खास छायाचित्रे...