आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • It's Not My Son In The Picture Says Shilpa Shetty

शिल्पाच्या हातात असलेले हे बाळ कुणाचे ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा शेट्टीचा बाळाबरोबर असलेला हा फोटो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. हे बाळ म्हणजे शिल्पा शेट्टीचा मुलगा वियान असल्याचे लोकांना वाटत आहे. मात्र ही चुकीची बातमी आहे. शिल्पाच्या हातात असेलेले हे बाळ म्हणजे वियान नाहीये. खुद्द शिल्पानेच याचा खुलासा केला आहे.

शिल्पाने आपल्या ट्विटरवर ट्विट केले की, "माझ्या एका छायाचित्रामुळे भरपूर चर्चा होत आ हे. कारण माझ्या हातात असलेले बाळ माझा मुलगा वियान असल्याचे लोकांना वाटत आहे. मात्र हा वियान नसून माझी भाजी शायना आहे. हा वर्षभरापूर्वी घेतलेला फोटो आहे."

शिल्पाने २१ मे २०१२ रोजी मुलगा वियानला जन्म दिला. तेव्हापासूनच शिल्पाचा मुलगा कुणासारखा दिसतो याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. विशेष म्हणजे शिल्पाच्या मुलाप्रमाणेच ऐश्वर्याची मुलगी आराध्याविषयीसुद्धा बरीच उत्सुकता आहे. मात्र ऐश्वर्या आपल्या मुलीला जगासमोर आणण्यास उत्सुक नाहीये. दुसरीकडे अभिनेत्री सेलिना जेटली आपल्या पती आणि मुलांसह मॅग्झिनच्या कव्हर पेजवर झळकली आहे. सेलिनाने यावर्षी मार्चमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिला होता.
शिल्पा शेट्टी रिलॉन्च करणार झूम चॅनल
छकुल्याने उडवली शिल्पा शेट्टीची झोप !
शिल्पा शेट्टी 'हिंदुजा'मधून डिस्चार्ज! फोटोत पाहा तिचे गोंडस बाळ
पुत्ररत्न प्राप्तीच्या शिल्पा-राज कुंद्रावर शुभेच्छांचा वर्षाव
शिल्पा शेट्टीने दिला गोंडस मुलाला जन्म