आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राज-3'मधून जॅकलीन आऊट, ईशा गुप्‍ता इन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महेश भट यांच्‍या बहुचर्चित 'राज-3' या चित्रपटातून भट मंडळींची लाडकी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा पत्‍ता कट झाला आहे. जॅकलीनच्‍या जागी ईशा गुप्‍ताची वर्णी लागली आहे.
निर्मात्‍यांनी तिच्‍याशी झालेला करारही रद्द केला आहे. दिग्‍दर्शक विक्रम भट आणि जॅकलीन यांच्‍यात झालेल्‍या वादामुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला.
निर्माते महेश भट याबाबत अधिकृत घोषणा करत म्‍हणाले की, 'विक्रमने ठरवलेली वेशभुषा जॅकलीनला आवडली नाही. पण, दिग्‍दर्शकाला विरोध केल्‍यामुळे तिच्‍याकडे चित्रपट सोडण्‍याशिवाय गत्‍यंतर नव्‍हते.
निर्मात्‍यांनीही विक्रमचे महत्‍त्‍व ओळखून त्‍याच्‍याऐवजी जॅकलीनलाच चित्रपटातून काढून टाकण्‍यात धन्‍यता मानली. जॅकलीनऐवजी ही भूमिका ईशा गुप्‍ता चांगली करेल, असा विक्रमला विश्‍वासला वाटतो. महेश भट यांच्‍या 'जन्‍नत-2'मध्‍येही ईशा मुख्‍य भूमिकेत आहे. त्‍यामुळे, आता जॅकलीनऐवजी ईशावर भट मंडळींची कृपा होणार आहे.