फाइल फोटो: 'किक'च्या एका प्रमोशन इव्हेंटमध्ये जॅकलीन फर्नांडिस आणि सलमान खान
मुंबई: अलीकडेच, एका टीव्ही शोच्या सेटवर पोहोचलेल्या सलमानने 'किक'मधील त्याच्या को-स्टार जॅकलीनला खान म्हणून बोलावले. सलमानच्या तोंडून जॅकलीनसाठी खान नाव ऐकून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसणे सामान्य होते. याविषयी जॅकलीनला विचारण्यात आले तेव्हा ती स्वत: या गोष्टीने अचंबित झाल्याची प्रतिक्रिया तिने दिली. ती म्हणाली, 'मी काय सांगू. हे सर्वांप्रमाणे माझ्यासाठीसुध्दा आश्चर्यचकित करणारी घटना होती.'
यावेळी तिने सलमानची प्रशंसादेखील केली. ती पुढे म्हणाली, 'सलमान एक चांगला व्यक्ती आहे. माझा रोल मॉडेल आहे.' जेव्हापासून साजिद नाडियाडवालाच्या 'किक'मध्ये दोघांनी काम करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून त्यांचे नाव जोडले जात आहे. सिनेमाच्या शुटिंग ते प्रमोशन इव्हेंटमध्येसुध्दा त्यांच्यात चांगली केमिस्ट्री दिसून आली आहे.
पुढील स्लाइड्सवर तुम्हीच पाहा प्रमोशनल इव्हेंट आणि शुटिंगदरम्यान सलमान आणि जॅकलीन यांच्यातील केमिस्ट्रीची झलक...