आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline Doing Yoga On Roy's Malaysia Location

जॅकलिनचा फिटनेस फंडा मलेशियातदेखील कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(योगा करताना जॅकलिन फर्नांडिस)
जॅकलिन फर्नांडिस आपल्या परफेक्ट फिट बॉडीचे सर्व श्रेय नियमितपणे करत असलेल्या योगा या व्यायाम प्रकाराला देते. रोज सकाळी नित्यनियमाने योगा करणे हा जॅकलिनचा मागील काही वर्षांपासून दिनचर्येचा एक भाग बनला आहे. आऊटडोर शूटिंगच्या दरम्यानदेखील जॅकलिन आपल्या दिनचर्येमध्ये सातत्य ठेवते.
याचे ताजे उदाहरण, 'रॉय'च्या शूटिंगदरम्यान पाहायला मिळाले. मलेशियामध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जॅकलिन रोज सकाळी योगा करत असत. अनेक वेळा ती समुद्राकाठी जाऊन योगासने करत असत. या वेळी तिच्यासोबत टीममधील काही सदस्य 'रॉय'मधील सहकलाकार अर्जुन रामपालदेखील उपस्थित होता.
जॅकलिनच्या व्यायाम प्रकारामध्ये दररोज ३०-४० सूर्यनमस्कार, दोन आठवड्यांतून एकवेळा १०८ सूर्यनमस्कार, प्रत्येक सरावानंतर ३०० कपालभाती आणि प्राणायाम इत्यादींचा समावेश असतो. शूटिंगदरम्यानच्या काळात कितीही थकलेली असली, तरी जॅकलिन आपल्या दिनचर्येच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते.