(जॅकलिनच्या पाया पडताना वर-वधू)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोमवारी तिचे पर्सनल असिस्टंट राम यांच्या भाच्याच्या लग्नात सहभागी झाली होती. मुंबईतील कांदिवली येथे हा लग्नसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी जॅकलीनने मसाबा गुप्ताने डिझाइन केलेली लहेंगा साडी परिधान केली होती.
या लग्नसमारंभात जॅकलिनने उपस्थितांची मनमोकळपणाने भेट घेतली. तिने पाहुण्यांसोबत फोटोसुद्धा काढून घेतले. इतकेच नाही तर वर-वधूंनी जॅकलिनच्या पाया पडून तिच्याकडून आशीर्वादसुद्धा घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या लग्नसमारंभातील जॅकलिनची छायाचित्रे...