आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jacqueline Fernandis Will Be Seen In Housefull 3

'हाउसफुल-3'मध्ये असणार जॅकलीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हाउसफुल' फ्रँचायझीच्या तिसर्‍या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिसचा सहभाग असण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी तिचा माजी प्रियकर साजिद खानऐवजी साजिद- फरहाद जोडीकडे देण्यात आली असून निर्मिती साजिद नाडियादवालाची आहे. कलावंतांच्या यादीत अक्षय कुमार आणि रितेश देशमुख तर आहेतच, पण त्याशिवाय अभिषेक बच्चनदेखील या चित्रपटात काम करणार आहे.
एका सूत्रानूसार, 'हाउसफुल-3 मध्ये काम करण्यासाठी जॅकलीनशी संपर्क साधण्यात आला आहे. चित्रपटाच्या तारखा आणि इतर समस्या उद्भवल्या नाही तर ती हा चित्रपट करू शकते. हाउसफुल-2 जॅकलीनचा माजी प्रियकर साजिद खानने दिग्दर्शित केला होता. याच चित्रपटादरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले आणि लगेच ब्रेकअपदेखील झाला.
साजिद-फरहाद या दिग्दर्शक जोडीचा हा दुसरा चित्रपट असेल. त्यांचा 'इट्स एंटरटेनमेंट' हा पहिला चित्रपट असून त्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात अक्षयची प्रमुख भूमिका आहे.