'किक'मधील 'जुम्मे की रात..' या गाण्याच्या दृश्यात सलमान खान आणि जॅकलिन
मुंबई - बॉलिवूडचा दबंग सलमान खान सध्या जॅकलिनवर फिदा झालेला दिसतोय. अलीकडेच ऑन रेकॉर्ड जॅकलिन इंडस्ट्रीतील पुढची झीनत अमान असल्याचे सांगून त्याने हे स्पष्टसुद्धा करुन दिले. सलमानने काही दिवसांपूर्वीच या श्रीलंकन ब्युटीसोबत 'किक'मधील दोन गाणी शूट केली. गंमतशीर गोष्ट म्हणजे, सलमान पहिल्यांदाच ऑन स्क्रिन आपल्या हिरोईनकडे किसची मागणी करताना या गाण्यात दिसत आहे.
'किक'शी संबंधित एका सूत्राने सांगितल्याप्रमाणे, सिनेमाची टीम सलमान आणि जॅकलिनवर चित्रीत होणारे 'जुम्मे की रात' हे गाणे शूटिंगच्या शेवटच्या टप्प्यात चित्रीत करु इच्छित होती. टीमची कल्पना एक मोठे गाणे शूट करण्याची होती. ठरल्याप्रमाणे गाणे चित्रीत झाले.
जॅकलिन अशी पहिली अभिनेत्री आहे, जिच्याकडे सलमान ऑन स्क्रिन किसची डिमांड करतोय. सलमानने आजवर आपल्या सिनेमांमध्ये अभिनेत्रींना किस करण्यात रुची दाखवली नाही. मात्र दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला यांनी आपल्या सिनेमात ही किमया करुन दाखवली.
आता या गाण्यातील सलमान-जॅकलिनची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडते का? हे येणा-या दिवसांत स्पष्ट होईल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'किक'मधील 'जुम्मे की रात' या गाण्याची खास छायाचित्रे...