आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jai Maharashtra Dhaba Bhatinda Released On 14th Feb

\'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा\' 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये होणार दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवधूत गुप्तेचा 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होतोय. या सिनेमाद्वारे छोट्या पडद्यावर दिसलेला चेहरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. झी मराठी वाहिनीवरील 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या मालिकेत झळकलेला अभिजित खांडकेकर या सिनेमात दिसणार आहे. अभिजीतबरोबर प्रार्थना बेहरे या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.

अभिजितने या सिनेमात सयाजी निंबाळकर या युवकाची भूमिका साकारली आहे. सयाजी एका पंजाबी मुलीवरील प्रेमाखातर पंजाबच्या भटिंडा शहरात जाऊन आपला मराठी ढाबा थाटतो आणि यशस्वीरित्या चालवून दाखवतो. तेथेच त्याची प्रेमकहाणी फुलते. पंजाबच्या रांगड्या मातीत ही लव्हस्टोरी चित्रित करण्यात आली आहे. पंजाबमध्ये जाऊन महाराष्ट्राची वेगळी ओळख सांगणार्‍या युवकाची ही कथा आहे. प्रार्थना बेहरेने या सिनेमात पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे.

या सिनेमाला नीलेश मोहरीरचे संगीत असून दिग्दर्शन अवधूतने केले आहे. उमेश जाधवने या सिनेमातील गाणी कोरिओग्राफ केली आहेत.

छायाचित्रांमध्ये पाहा या सिनेमातील गाण्याची खास झलक...