आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवी-देवता आणि नवग्रहांच्या साक्षीने रंगला खंडेराय-म्हाळसाचा विवाहसोहळा, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जीवनगाथेवर आधारीत ‘जय मल्हार’ या मालिकेत अलीकडेच खंडेरायाच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या घटनेचे साक्षीदार होण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. ही घटना म्हणजे खंडेराया आणि म्हाळसादेवीचा विवाह. नवग्रहांच्या साक्षीने आणि देवी-देवतांच्या उपस्थितीतील या दैवी विवाहसोहळ्याचे दर्शन प्रेक्षकांना घडले.
या विवाहसोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे तत्कालीन परंपरा आणि विधींचं दर्शन यामधून प्रेक्षकांना घडले. खंडेराय-म्हाळसाची हळद, केळवण, देवक पुजन, जात्याची पुजा, गोंधळ, लंगर तोडण्याची प्रथा आणि विवाहसोहळा हे सर्व अतिशय भव्य दिव्य पद्धतीने प्रेक्षकांना बघता आले.
विवाहासाठी म्हाळसादेवीची लगबग, तिची वेशभूषा, दागिन्यांनी सजलेली म्हाळसा, निळ्या घोड्यावरून विवाहाला येणारे खंडेराय, त्यांचे भरजरी वस्त्र, आभूषणे, अलंकार अशा सर्व गोष्टींनी सजलेला हा विवाह सोहळा नेत्रदीपक ठरला. 17 ऑगस्टच्या दोन तासांच्या भागात देवाचा न भूतो न भविष्यती असणारा हा अद्भूत विवाहसोहळा पार पडला.
झी मराठीवरील ही मालिका अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे. भव्य दिव्य सेट्स, स्पेशल इफेक्ट्स आणि कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिली. प्रसिद्ध अभिनेते-निर्माते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सची निर्मिती असलेल्या 'जय मल्हार' या मालिकेत मल्हाराची भूमिका देवदत्त नागे यांनी तर म्हाळसाची भूमिका सुरभी हांडे आणि बाणाईची भूमिका ईशा केसकरने साकारली आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा खंडेराया आणि म्हाळसादेवीच्या विवाहसोहळ्याची खास छायाचित्रे...