आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णाच्या रुपात ही चिमुकली झाली लोकप्रिय, पाहा रिअल लाइफ PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सागर आर्ट्सने 1993 साली 'श्रीकृष्णा' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती. त्यावेळी अभिनेता स्वप्नील जोशी श्रीकृष्णाच्या भूमिकेत छोट्या पडद्यावर झळकला होता. 1993 नंतर सागर आर्ट्सने 2008 साली नव्या रुपात कृष्णावर आधारित मालिका छोट्या पडद्यावर आणली. या मालिकेचे नाव होते 'जय श्रीकृष्णा'. या मालिकेतबद्दलची रंजक गोष्ट म्हणजे या मालिकेत बाळ कृष्णाची भूमिका मुलाने नव्हे, तर लहानग्या मुलीने साकारली होती.
31 जुलै 2008 रोजी छोट्या पडद्यावर दाखल झालेल्या 'जय श्री कृष्णा' या मालिकेतील बाळकृष्णाच्या रुपात झळकलेल्या धृती भाटियाने भरपूर लोकप्रियता मिळवली. श्रीकृष्णाच्या रुपातील धृती भाटीयाचे मनमोहक रुप प्रेक्षकांना भावले. रिअर लाईफमध्येही धृती अतिशय क्यूट आणि बडबडी आहे. ती आता नऊ वर्षांची झाली आहे. त्यावेळी ती केवळ तीन वर्षांची होती.
धृती जेव्हा केवळ पाच महिन्यांची होती, तेव्हा एका बेबी गारमेंटच्या जाहिरातीत ती झळकली होती. त्यानंतर ज्युनिअर हॉरलिक्सच्या जाहिरातीत ती दिसली होती. धृतीचे वडील गगन भाटिया मार्केटिंग फिल्डमध्ये कार्यरत आहेत, तर आई पूनम क्लासिकल डान्सर आहे.
आज आम्ही तुम्हाला छायाचित्रांमधून धृतीचा वेगळा आणि नटखट अंदाज छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत..