आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaya Bachchan And Amitabh Bachchan Paired Up For Leader

'लीडर'मध्ये झळकणार जया-अमिताभ, पाहा FIRST LOOK लाँचची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते अमिताभ बच्चन यांचे मेकअपमॅन असलेले दीपक सावंत यांनी त्यांच्या पहिल्या हिंदी सिनेमाची निर्मिती केली आहे. लीडर हे शीर्षक असलेल्या या सिनेमात प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन आणि जया बच्चन झळकणार आहेत. अलीकडेच या सिनेमाचा फस्ट लूक अमिताभ बच्चन यांच्या हस्ते लाँच करण्यात आला.
दीपक सावंत यांनी आत्तापर्यंत दोन भोजपूरी आणि एका मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सर्व सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी भूमिका साकारल्या होत्या. तर जया बच्चन यांनीही त्यांच्या गंगा देवी आणि अक्का या दोन सिनेमांत अभिनय केला आहे.
अभिषेक चड्ढा यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला असून सिनेमाची कथा मास्टर विशंभरनाथ (अमिताभ) आणि त्यांची पत्नी कल्याणी (जया) यांच्या भोवती गुंफण्यात आली आहे. या दाम्पत्याला एक मुलगा असतो. या सुखी कुटुंबाला एका स्थानिक आमदाराची (गुलशन ग्रोव्हर) नजर लागते. हा आमदार विशंभरनाथ यांना त्याच्या पक्षात सहभागी होण्यास सांगतो, त्याचा हा प्रस्ताव विशंभरनाथ नाकारतात. त्यानंतर तो आमदार त्यांच्यासमोर अडचणींचा डोंगर निर्माण करतो.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा फस्ट लूक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...