आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jaya Bachchan News In Marathi, Bollywood, Hailstorm, Divya Marathi

अभिनेत्री जया बच्चन या चक्क गारपीटग्रस्त, मिळणार भरपाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - नेते, अधिकारी आणि चित्रपट ता-यांनाही गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा मोबदला मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या यादीत अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या खासदार पत्नी जया बच्चन, माजी मंत्री इंद्रजित पटेल आणि आयएएस अधिकारी विनोद सेमवाल यांच्यासह अनेक बड्यांची नावे आहेत. आता 16 मेनंतर प्रशासनाकडून या लोकांना चेकद्वारे मोबदला दिला जाणार आहे. भोपाळलगतच्या गावांत अनेक अधिकारी, नेते, चित्रपट ता-यांनी शेती घेतलेली आहे. अनेक जण स्वत:ला शेतकरी दाखवून, शेतीचा व्यवसायही दाखवतात.

पाच एकर शेती, 14 हजार मिळणार
जया बच्चन यांची बिसनखेडीमध्ये 5 एकर जमीन आहे. त्यांना 14 हजार रुपये नुकसान भरपाई मिळेल. बड्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात येणा-या या जमिनीवर विकासाची परवानगी घेण्यावरून वाद झाला होता.