आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'अँग्री मॅन\'ची \'अँग्री वुमन\', वाचा जया बच्चन यांची वादग्रस्त वक्तव्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जया बच्चन)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन रिल लाइफमध्ये 'अँग्री मॅन' म्हणून ओळखले जातात. परंतु रिअल लाइफमध्ये त्यांची पत्नी जया बच्चन 'अँग्री वुमन' आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. अनेकदा माध्यमांना आणि पत्रकार परिदषेत अनेक पत्रकारांना त्यांच्या रागाचा सामना करावा लागला आहे. अलीकडेच, जया यांनी फोटोग्राफर्सवर 'लो अँगल'ने फोटो काढल्याने राग व्यक्त केला होता.

जया बच्चन यांच्या वादग्रस्त वक्तव्याने अनेकदा अमिताभ यांना त्या प्रकरणात मध्यस्ती करावी लागते. वादग्रस्त वक्तव्यामुळेच बच्चन आणि गांधी कुटुंबात ताणाव निर्माण झाला होता. एवढेच नव्हे, जया यांच्या एका वक्तव्याने बच्चन कुटुंबीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेच्या निशाण्यावर आले होते.
एकदा सार्वजनिक ठिकाणी एका पत्रकाराने त्यांना अमिताभ यांच्या कर्करोगाविषयी प्रश्न विचारला होता, तेव्हा जया यांनी त्याची कॉलर पकडली होती. अमिताभ यांनी जया यांच्या या कृत्यानंतर माफी मागितली होती. त्यावेळी जया यांनी एका मुलाखतीत अमिताभ यांच्याशी निगडीत प्रश्नावर सांगितले होते, की ते आपले म्हणणे मांडू शकता तर माफी का मागताय.
आता जया पुन्हा एकदा अशाच एका वक्तव्याने चर्चेत आल्या आहेत. त्यांनी यावेळी शाहरुख आणि फराह खानच्या 'हॅपी न्यू इअर'ला 'बकवास' म्हणून टिका केली आहे. याबाबत अमिताभ यांनी शाहरुखची माफीदेखील मागितली आहे. आता यावर जया काय प्रतिक्रिया देतील हे
लवकरच कळेल. आम्ही तुम्हाला या पॅकेजच्या माध्यमातून जया यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल सांगत आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा जया बच्चनचे चर्चेतील वक्तव्य...