आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HAPPY NEW YEARला जया यांनी म्हटले 'बकवास', बिग बींनी केली प्रशंसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अमिताभ बच्चन आणि जया बच्चन)
मुंबई- गेल्या दोन दिवसांत दोन दिग्गज कलाकारांनी शाहरुख खानच्या 'हॅपी न्यू इअर' सिनेमाविषयी मत व्यक्त केले. रंजक गोष्ट म्हणजे, याच सिनेमाचा भाग असलेल्या अभिषेक बच्चनचे वडील अमिताभ आणि आई जया बच्चन यांनी हे मत व्यक्त केले आहे. जया यांनी सिनेमा 'बकवास' असल्याचे सांगितले, तर अमिताभ यांनी प्रशंसा केली.
अमिताभ यांनी टि्वटरवर शाहरुख खान आणि फराह खानला शुभेच्छा दिल्या. 'हॅपी न्यू इअर'ची जागतीक कमाई 300 कोटी झाली आहे. अमिताभ यांनी टि्वट केरून लिहिले, 'वाह! हॅपी न्यू इअरने ग्लोबली 300 कोटींची कमाई केली. शाहरुख आणि फराह खानला खूप खूप शुभेच्छा. फराह आणि शाहरुख या कमाईचे प्रमुख दावेदार आहेत. फराह तू मला तुझ्या सिनेमात कधी घेणार आहे.'
अमिताभ यांच्या या टि्वटवर पत्नी आणि गतकाळातील अभिनेत्री जया यांनी टि्वट करून या सिनेमाला 'बकवास' म्हणून टिका केली. आतापर्यंत जयाच एकमेव अशा व्यक्ती आहेत, ज्यांनी सिनेमावर सार्वजनिकरित्या टिका केली आहे.
या सिनेमात आमिताभ आणि जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक बच्चनसुध्दा मुख्य भूमिकेत आहे. सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगली प्रतिक्रिया मिळाली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमिताभ यांचे टि्वट...