आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नातवंडांसोबत जया यांनी साजरा केला वाढदिवस, आराध्याने गायले बर्थ डे साँग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या प्रसिध्दी अभिनेत्री जया बच्चन यांनी 9 एप्रिल 2014ला वयाची 66 वर्षे पूर्ण केली आहेत. जया यांच्या वीाढ दिवसानिमित्ता त्यांच्या कुटुबीयांनी खास डिनर पार्टीचे आयोजन केले. जया यांनी त्यांचे पती अमिताभ बच्चन. मुलगा अभिषेक बच्चन आणि सून ऐश्वर्या आणि नात आराध्या यांच्यसोबत डिनर पार्टीचा आनंद घेतला. जया यांना शुभेच्छा देण्यासाठी खास दिल्लीहून त्यांची मुलगी श्वेता नंदा पती निखिल नंदासोबत मुंबईत दाखल झाली होती. यावेळी तिची मुले अगस्त्य आणि नव्या नवेली हे तिचे मुलेसुध्दा उपस्थित होते.
आईच्या वाढदिवशी अभिषेक बच्चनने त्यांच्यासोबत फोटो काढले. हे फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या छायाचित्रात अभिषेक जया यांच्यासोबत आनंदी दिसत आहे. जया यांनी पंजाबी ड्रेस तर अभिषेकने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. जवळच्या सुत्राने सांगितल्याप्रमाणे, जया यांचा बर्थ डे केक नात आराध्याने कापला आणि आजीसाठी तिने वाढदिवसाचे खास गाणेसुध्दा म्हटले.
अमिताभ बच्चन यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर बर्थ डे प्लॅनविषयी सांगितले, 'सकाळी भूतनाथ रिटर्न्सच्या प्रमोशनसाठी दिल्लीला रवाना व्हायचे होते. अनेक मुलाखती आणि पत्रकार परिषद होत्या. घरी परतलो तेव्हा जया यांच्या बर्थ डेच्या प्लॅननुसार फॅमिली डिनर केले. कुटुबीयांना एकत्र बघून आनंद झाला.'
अमिताभ यांनी पुढे सांगितले, 'दिल्लीवरून माझी मुलगी श्वेता अगस्त्य आणि नव्या नवेलीसोबत आली आहे.' श्वेताने आजपर्यंत कुटुंबातील कोणताही कार्यक्रम मिस केलेला नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अभिषेकच्या इंस्टाग्राम प्रोफाइलची छायाचित्रे...