आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX:बर्थ डे पार्टीत जितेंद्रचा दिसला खास अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 60च्या दशकात अभिनेते जितेंद्र यांनी बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. जितेंद्र यांना अभिनयापेक्षा त्यांच्या हटके नृत्यशैलीसाठी ओळखले जाते. जीतू या नावाने प्रसिद्ध असलेले जितेंद्र यांनी 7 एप्रिल 2014 रोजी आपला 72 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या कुटुंबीयांसह एक छोटी पार्टी एन्जॉय केली. या पार्टीत त्यांचे जवळचे मित्रसुद्धा सहभागी झाले होते.
ही पार्टी जितेंद्र यांच्या जुहू स्थित घरी आयोजित करण्यात आली होती. यावेळी जितेंद्र त्यांची पत्नी शोभा कपूर, मुलगी एकता कपूर आणि मुलगा तुषार कपूर यांच्यासह दिसले. यावेळी जितेंद्र यांचा हटके अंदाज बघायला मिळाला. त्यांनी ब्लॅक टी शर्ट आणि ब्लॅक बरमुडा घातला होता. पायात स्पोर्ट्स शू आणि कानात हेडफोन घातले होते. ते जणू इव्हिनिंग वॉकला निघाले असे वाटत होते.
जितेंद्र यांनी 1959 मध्ये 'नवरंग' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली होती. 1964मध्ये रिलीज झालेल्या गीत गाया पत्थरोंने या सिनेमाद्वारे त्यांना खरी ओळख प्राप्त झाली होती. बॉलिवूडमध्ये जंपिंग जॅकच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या जितेंद्र यांनी आपल्या करिअरमध्ये 200 हून अधिक सिनेमांत अभिनय केला आहे. फर्ज’, ‘गीत गाया पत्थरों ने’, ‘कारवां’, ‘हिम्मतवाला’ यासह अनेक हिट सिनेमे त्यांच्या नावावर जमा आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा जंपिंग जॅक जितेंद्र यांच्या वाढदिवसाच्या काही छायाचित्रे...