आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jennifer Lopez First Time In India For Hinduja Wedding

PHOTOS: शाही लग्नात परफॉर्मन्ससाठी पहिल्यांदाच भारतात आली जेनिफर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जेनिफर लोपेजने पाहुण्यांमध्ये जाऊन परफॉर्म केले.)
उदयपूरः हिंदुजा ग्रुपचे संजय हिंदुजा लेकसिटीत शाही थाटात बोहल्यावर चढले. प्रसिद्ध फॅशन डिझायनर अनु मीरचंदानी (मेहतानी) सोबत संजय हिंदुजा विवाहबद्ध झाले. या हाय प्रोफाईल लग्नात प्रसिद्ध अमेरिकन सिंगर जेनिफर लोपेजचे सादरीकरण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या लग्नाच्या निमित्ताने जेनिफर पहिल्यांदाच भारतात आली आहे. तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर लेकसिटीत क्लिक केलेली सेल्फी पोस्ट करुन 'फस्ट टाइम इन इंडिया' असे लिहिले आहे.
अमेरिकन स्टार निकोलने ट्विट केले, 'कलरफूल इंडिया'
या शाही लग्नात अमेरिकन स्टार निकोल शेर्जिंगर सहभागी झाली. तिने स्वतःची एक सेल्फी ट्विटरवर पोस्ट करुन लिहिले, "कलरफुल इंडिया : सो ब्लेस्ड टू परफॉर्म हिअर."
तीन दिवसांत 208 चार्टर विमानातून 800 पाहुणे झाले दाखल
तीन दिवसांच्या वेडिंग सेरेमनीत 800 व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी झाले. 208 चार्टर प्लेनने पाहुणे येथे पोहोचले. उदयपूरमध्ये पाहुण्यांसाठी 16 व्हॉल्वो बस, 30 बीएमडब्ल्यू, 30 ऑडी, 30 मर्सिडीज, 40 इनोव्हाची व्यवस्था करण्यात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या शाही लग्नात सहभागी झालेल्या जेनिफरच्या परफॉर्मन्सेस छायाचित्रे आणि पॉप सिंगर निकोलने घेतलेली सेल्फी...