आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jennifer Lopez Will Performe In Sanjay Hinduja Royal Wedding

संजय हिंदुजाच्या लग्नात उतरले 123 चार्टर प्लेन, डोळे दिपवणारा ठरेल लग्नसोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून- सोहेल खान पत्नी सीमा सचदेवसोबत, उजवीकडे- परदेशी पाहुणे)

उद्यपूरः हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष संजय हिंदुजा आणि डिझायनर अनु मीरचंदानी (मेहतानी) यांच्या हायप्रोफाइल लग्नात सहभागी होण्यासाठी व्हीव्हीआयपी पाहुणे लेकसिटीत दाखल झाले आहेत. दोन दिवसांत 123 चार्टर प्लेन याठिकाणी पोहोचले. 20 विमाने थेट परदेशातून येथे आले आहेत. मंगळवारी 73 आणि बुधवारी 50 विमाने येथे दाखल झाले. विमानांची गर्दी एवढी झाली, की उदयपूरच्या विमानतळावर जागाच शिल्लक राहिली नाही. विमानतळाचे ओएसडी विनय दाहिमा यांनी सांगितले, की येथे केवळ 10 विमानांच्या पार्किंगची परवानगी आहे. त्यामुळे इतर विमाने अहमदाबाद, जयपूर आणि दिल्ली विमानतळावर पाठवण्यात आली आहेत. एकुण 750 पाहुणे उदयपूरमध्ये दाखल झाले आहेत. हॉलिवूड पॉप सिंगर जेनिफर लोपेज गुरुवारी म्हणजे वेडिंग सेरेमनीत परफॉर्म करणार आहे.
अब्जाधीश, हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्सची मांदियाळी...
या शाही लग्नाच्या विधींना बुधवारपासून सुरुवात झाली. बुधवारी मेंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी कलरफूल ट्रेडिशनल इंडियन ड्रेस कोड थीम ठेवण्यात आली होती. गुरुवारी संध्याकाळी लग्नसोहळा पार पडणार आहे. यासाठी उदयविलास येथून वरात निघणार आहे. बुधवारी लेकसिटीत दाखल झालेल्या पाहुण्यांमध्ये मलायका अरोरा खान, स्टील किंग लक्ष्मी मित्तल पत्नीसोबत विशेष चार्टर प्लेनने येथे पोहोचले.
याशिवाय व्हीव्हीआयपी पाहुण्यांमध्ये युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेरी, सऊदी अरबचे शेखळ रसल खेरा, उद्योगपती गौतम अडाणी, माजी मंत्री प्रफुल्ल पटेल, हॉलिवूड स्टार जॉन कैरी, बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह, अर्जुन कपूर, विशाल ददलानी, राज कुंद्रा, सोहेल खान आणि त्याची पत्नी सीमा खान यांचा समावेश होता. या सेलिब्रिटींची एक झलक बघण्यासाठी विमानतळाबाहेर मोठी गर्दी जमली होती. पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खानच्या नावाचाही समावेश आहे. त्याची पत्नी गौरी मंगळवारीच येथे पोहोचली.
शिव निवासमध्ये पार पडल्या विधी..
संजय हिंदुजा आणि अनु यांची मेंदी विधी शिव निवास पॅलेसमध्ये पार पडली. मेंदी विधीत कुटुंबीयांसह पाहुण्यांनी हजेरी लावली होती. तर संध्याकाळी जनाना महलमध्ये आयोजित संगीत सेरेमनीत हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्सनी सादरीकरण केले.
आज होणार लग्नसोहळा..
गुरुवारी संध्याकाळी चार वाजता उदय विलास येथून संजय हिंदुजां यांची वरात निघणार आहे. जग मंदिरात ही वरात पोहोचेल. येथेच लग्नसोहळा होईल. लग्नासाठी ट्रेडिशनल इंडियन फॉर्मल ही थीम ठेवण्यात आली आहे. येथे पाहुण्यांसाठी रिसेप्शनमध्ये गाला डिनर ठेवण्यात आले आहे.
सर्व मोठे हॉटेल्स बूक...
वेडिंग प्लेसः जगमंदिर येथे वेडिंग सेरेमनी, शिव निवासमध्ये मेंदी सेरेमनी, सिटी पॅलेसच्या माणक चौकात संगीत संध्या, जनाना महलमध्ये संगीत.
हॉटेल बूकः लेक पॅलेस, उदय विलास, लीला पॅलेस, रेडिसन, शिव निवास पॅलेस, फतह प्रकाश पॅलेस आणि ट्रायटेंड.
आमंत्रित पाहुणेः 750
चार्टर प्लेनः 123
व्हॉल्वो बसः 16
बीएमडब्ल्यूः 30
ऑडीः 30
मर्सडिजः 30
इनोवाः 40
पुढील स्लाईड्समध्ये पाहा लग्नात सहभागी होण्यासाठी बुधवारी लेकसिटीत दाखल झालेल्या सेलिब्रिटींची छायाचित्रे...