आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jiah Khan Death: HC Asks Cops Why SMS Text, Calls Not In Chargesheet

जिया आत्महत्या प्रकरण : आरोपपत्रात एसएमएस, कॉलचा उल्लेख का नाही?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेत्री जिया खानच्या मृत्यूपूर्वी तिच्या मोबाइलवर आलेले कॉल्स आणि एसएमएसचा उल्लेख आरोपपत्रात का केला नाही, अशी विचारणा उच्च न्यायालयाने जुहू पोलिसांकडे शुक्रवारी केली. याप्रकरणी जियाची आई राबिया यांनी सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती नरेश पाटील आणि अभय ठिपसे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी सुनावणी झाली. जियाच्या मृत्यूपूर्वी तिच्या मोबाइलवर आलेल्या एसएमएस आणि कॉल्सची माहिती पोलिसांनी आरोपपत्रात दिली नाही. जियाने आत्महत्या करण्यापूर्वी सूरज पांचोलीला शेवटचा फोन केला होता.

सुनावणीदरम्यान सरकारतर्फे माधवी म्हेत्रे यांनी बाजू मांडत याबाबत म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून मागितला. जियाच्या आत्महत्येनंतर तिचा प्रियकर सूरज पांचोलीला अटक करण्यात आली होती. काही दिवसांनंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. त्यामुळे जियाची हत्या झाल्याचे सांगत रबिया यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.