आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जोधा अकबर' लवकरच येणार मालिकेच्‍या रूपात

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशुतोष गोवारीकर यांचा 'जोधा अकबर' हा चित्रपट लवकरच छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्‍या भेटीस येणार आहे.
नितीन मनमोहन देसाई आणि सागर आर्ट्स या दोन मोठ्या निर्मात्‍यांनी हा चित्रपट दैनंदिन मालिकेच्‍या रूपात दाखवण्‍याची इच्‍छा व्‍यक्‍त केली आहे. परंतु, याबाबत अद्याप कसलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जर सगळ्या गोष्‍टी सुरळित झाल्‍या तर 'जोधा अकबर' हा चित्रपट प्रेक्षकांना अनेक भागांमध्‍ये बघायला मिळेल. आता ही संधी कोणत्‍या निर्मात्‍याच्‍या आणि कोणत्‍या वाहिनीच्‍या पदरात पडेल ते पाहायचे. पण 'जोधा अकबर'मुळे संबंधित वाहिनीचा टीआरपी मात्र चांगलाच वाढणार, यात शंका नाही.