मुंबई: अभिनेता
जॉन अब्राहम सोमवारी (1 सप्टेंबर) मुंबईमध्ये Reebok Fithub storeच्या ओपनिंग इव्हेंटमध्ये सामील झाला होता. त्याच्यासह बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीसुध्दा दिसली. इव्हेंटमध्ये दोघांनी उपस्थितीतांशी धमाल-मस्ती केली.
जॉन यावेळी कंपनीचा टी-शर्ट आणि कॅप्री लूकमध्ये दिसला. तर नर्गिसने टी-शर्ट आणि जीन्स परिधान केलेली होती. या इव्हेंटमध्ये जॉन आणि नर्गिसने पुश-अप केले. जॉनने नर्गिसपेक्षा सर्वात जास्त पुश-अप केले. त्यांनी प्रेक्षकांकडूनही पुश-अप करून घेतले. त्यामध्ये तरुणींचाही सहभाग होता.
जॉन-नर्गिसनेत्र 'मद्रास कॅफे' एक सिनेमात काम केले होते. जॉनचा यावर्षी डिसेंबरमध्ये 'वेलकम बॅक' सिनेमा रिलीज होत आहे. हा सिनेमा 'वेलकम'चा सीक्वेल आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटमध्ये पोहोचलेल्या जॉन अब्राहम आणि नर्गिस फाखरीची छायाचित्रे...