आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John Abraham Injures His Back While Shooting In Dubai

दुबईमध्ये \'वेलकम बॅक\'च्या शूटिंगदरम्यान जॉन जखमी, पाठीला बसला झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- शूटिंगदरम्यान नाना पाटेकर आणि अनिल कपूरसोबत जॉन अब्राहम)
मुंबई- अभिनेता जॉन अब्राहम सध्या दुबईमध्ये 'वेलकम बॅक'चे शूटिंग करत आहे. बातमी आहे, की जॉन सिनेमाच्या सेटवर जखमी झाला आहे. त्याला एका वाळवंटाच्या सीनमध्ये एक कार चालवायची होती. या सीनवेळी तो जखमी झाला.
सूत्रांनी सांगण्यानुसार, क्लायमॅक्सच्या एका सीनमध्ये जॉनला काही कारपासून स्वत:ला वाचवायचे होते. त्याला समोरून येणा-या सर्व कार चकमा देऊन तिथून सुरक्षित बाहेर पडायचे होते. परंतु त्याने घाईत ब्रेक दाबल्याने त्याच्या पाठीला जखम झाली.
जखमीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर जॉनने फिजिओथेरपीचे अनेक सेशंस घेतले आणि पेन-किलर्स खाल्ला. आता त्याची तब्येत ठिक असून तो शूटिंग पूर्ण करू शकतो. डॉक्टरांनी त्याला एक महिना जड वस्तू उचलण्यास मनाई केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'वेलकम बॅक'च्या सेटवरील काही छायाचित्रे...