आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: बाइक्ससाठी क्रेजी आहे जॉन अब्राहम, पाहा त्याचे लग्झरी कलेक्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कंपनीकडून गिफ्ट करण्यात आलेल्या Aprilia RSV4 बाइकवर स्वार सवार जॉन अब्राहम)
बॉलिवूडचा हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक जॉन अब्राहम आज आपला 42 वा वाढदिवस (जन्म 17 डिसेंबर 1972) साजरा करत आहे. एक चांगला मॉडेल उत्कृष्ट अभिनेता होऊ शकत नाही, असे बॉलिवूडमध्ये म्हटले जाते. मात्र जॉनने यशस्वी मॉडेलसोबतच स्वतःला एक उत्कृष्ट अभिनेता म्हणूनही सिद्ध केले आहे.
2003 मध्ये 'जिस्म' या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण करणा-या जॉनने पहिल्याच सिनेमासाठी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार आपल्या नावी केला होता. यशस्वी मॉडेल, अभिनेता आणि पिळदार शरीरयष्टी असलेला जॉन बाइक्ससाठी क्रेजी आहे. त्याच्याकडे बाइक्सचे मोठे कलेक्शन आहे.
बाइक कलेक्शनः
जॉनकडे Aprilia RSV4 ही लेटेस्ट बाइक आहे. ही बाइक जॉनला गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात Piaggio कंपनीने भेट स्वरुपात दिली होती. या बाइकची किंमत 17.50 लाखांच्या घरात आहे. या बाइकव्यतिरिक्त जॉनकडे कस्टम बाइक, सुझुकी हायाबुसा, यामहा R1, यामहा व्ही-मॅक्स, सुझुकी GSX-1000RR, कावासाकी निंजा ZX-12 यांसारख्या लक्झरी बाइक्स आहेत.
कार कलेक्शनः
बाइक्सोबतच जॉनकडे लक्झरी कारचेही कलेक्शन आहे. ऑडी Q-7 ही त्याची आवडती कार आहे. तो दरवर्षी या कारचे मॉडेल बदलत असतो. याशिवाय त्याच्याकडे पांढ-या रंगाची जीप आणि ब्लॅक लिम्बोर्गिनी आहे.
जाणून घ्या जॉन अब्राहमच्या आयुष्याशी निगडीत फॅक्ट्स...
- जॉनने JA क्लॉथ आणि JA फिटनेस नावाने आपले क्लोथिंग ब्रॅण्ड्स लाँच केले आहेत.
- जानेवारी 2013 च्या फोर्ब्स लिस्टनुसार, मोस्ट पॉवरफुल सेलिब्रिटींच्या यादीत जॉन 21व्या स्थानावर होता.
- ब्रॅण्‍ड्सच्या कमाईव्यतिरिक्त जॉन एका सिनेमासाठी तब्बल सात कोटी रुपये मानधन घेतो. याशिवाय जाहिरातींसाठी तो दीड ते दोन कोटींच्या घरात मानधन आकारतो. सध्या तो गार्निअर मॅन, व्हीआयपी स्कायबॅग्स, पेटा, कॅस्ट्रॉल, फिलिप्स, ग्रेसिम, रिबॉक या कंपनीचे प्रॉडक्ट एन्डॉर्स करतोय.
- 2012 मध्ये पीपल्स मॅगझिनने जॉनला सेक्सिएस्ट मॅन अलाइव्ह हा किताब दिला होता. जॉन आत्तापर्यंत जीक्यू, फिल्मफेअर, पीपल, व्होग, ग्रेजिया, एफएचएमसह अनेक प्रतिष्ठित मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकला आहे.
- जॉनला JA या स्वतःच्या ब्रॅण्डची जीन्स परिधान करणे पसंत आहे. याशिवाय तो अरमानी ब्रॅण्ड्सचे शर्ट्स वापरतो. या ब्रॅण्ड्सच्या शर्टची किंमत 60 हजारांपासून सुरु होते. डिझायनर नरेंद्र कुमार अहमद यांचे कट सूट्स तो परिधान करतो. याशिवाय रॉकी एससुद्धा त्याचे आवडते डिझायनर आहे.
- फुटबॉल हा त्याचा आवडता खेळ असून फुटबॉलपटू होण्याचे त्याचे स्वप्न होते.
- 'शूटआउट अॅट वडाला' या सिनेमाचे दिग्दर्शक संजय गुप्तांना जॉनने आपली आवडती यामहा बाइक गिफ्ट केली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जॉन अब्राहमच्या बाइक आणि कार कलेक्शनचे फोटो...