आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉनने अमेरिकेत जाऊन गुपचूप केले 'शुभमंगल'?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचे करिअर सध्‍या जोरात सुरू आहे. त्‍याच्‍या खासगी आयुष्‍यात मात्र अनेक चढ-उतार सुरू आहेत. नुकतेच जॉनने त्‍याची नवी गर्लफ्रेन्‍ड प्रिया रूंचालशी अमेरिकेत लग्‍न केले असल्‍याची माहिती आहे.
जॉनने मात्र अद्याप त्‍याच्‍या लग्‍नाची अधिकृत घोषणा केलेली नाही. सूत्रांनुसार, 17 डिसेंबरला जॉनने त्‍याचा वाढदिवस प्रियासोबत साजरा केला. त्‍यानंतरच त्‍यांनी लग्‍नाचा निर्णय घेतला. जॉनच्‍या लग्‍नाला दोन आठवडे झाले असल्‍याची शंका सध्‍या व्‍यक्‍त केली जात आहे.
तसे पाहता, जॉन त्‍याच्‍या नात्‍यांविषयी लोकांपासून कधीच लपवत नाही. या गोष्‍टीमुळे बॉलिवूडमध्‍ये सगळेच त्‍याचे कौतुक करतात. असे असूनही जॉनने त्‍याच्‍या लग्‍नाविषयी बॉलिवूडमध्‍ये कुणालाच कळू दिले नाही याचे आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे. आता जॉन आणि प्रिया मीडियासमोर कधी येतात ते पाहायचे.