आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • John, Nargis And Dhoni Snapped At Reebok Live With Fire Campaign Shoot

मलेशियामध्ये जॉन-धोनीसोबत कँपेन शुट करतेय नर्गिस, बघा छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईमध्ये 9 एप्रिलला 'मै तेरा हीरो'ची सक्सेस पार्टी ठेवण्यात आली होती. या सक्सेस पार्टीमध्ये अनेक सेलेब्स पोहोचले होते. परंतु सिनेमाची मुख्य अभिनेत्री नर्गिस फाखरी मात्र दिसली नाही. त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला, की नर्गिस पार्टीत नाही तर कुठे व्यस्त आहे.
झाले असे, की नर्गिस सध्या मलेशियामध्ये असून तिच्यासोबत बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसुध्दा आहे. हे तिघे मलेशियामध्ये 'रीबॉक लाइव्ह विथ फायर कँपेन'ची शुटिंग करत आहेत. गुरूवारी (10 एप्रिल) या शुटिंगची काही छायाचित्रे समोर आली आहेत. कँपेन शुटमध्ये हे तिघे सोबत दिसत आहेत. जॉन, धोनी आणि नर्गिस शुटवेळी मस्तीभ-या अंदाजात दिसले.
सध्या हे तिघे थोडे फ्रि आहेत. नर्गिसचा सध्या कोणताही सिनेमा रिलीज होणार नाहीये. 2015मध्ये तिचा 'स्पाई' हा हॉलिवूड सिनेमा येणार आहे. या सिनेमातून ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच जॉनचा यावर्षी 'वेलकम बॅक' हा सिनेमा डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. धोनीसुध्दा 20-20 वर्ल्ड कपनंतर फ्रि झाला आहे. परंतु 16 एप्रिलला सुरू होणा-या आयपीएलमध्ये तो पुन्हा एकदा व्यस्त होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कँपेन शुटची काही छायाचित्रे...