आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मोहब्बते\' स्टार जुगल हंसराज गर्लफ्रेंड जास्मिनसह अडकला लग्नगाठीत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आणि दिग्दर्शक जुगल हंसराज आणि त्याची गर्लफ्रेंड जास्मिनचा गुपचुपरित्या विवाहसोळा पार पडला. त्यांना एका खासगी कार्यक्रमात आपले लग्न उरकून टाकले आहे. जुगलाचा मित्र अभिनेता उदय चोप्राने या नवदांपत्याला शुभेच्छा देण्यासाठी टि्वटरवर पोस्ट टाकली आहे, की 'माझा मित्र जुगल हंसराजला लग्नाच्या शुभेच्छा. जुगल आणि जस्मिन काल (6 जुलै) ऑकलंड मिशिगनमध्ये लग्नगाठीत अडकले आहेत.' असे उदयने टि्वटरवर पोस्ट केले.
नसिरुद्दीन शाह आणि शबाना आझमीच्या 'मासूम' (1983) सिनेमात बालकलाकार म्हणून काम केले. त्यानंतर त्याने 'आ गले लग जा' (1994) या सिनेमातून एक अभिनेता म्हणून करिअरला सुरूवात केली. त्याचा 'मोहब्बते' हा मल्टिस्टारर सिनेमा खूप गाजला होता. या सिनेमाच्या माध्यमातून त्याला बरीच लोकप्रियता मिळाली.