आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day : 47 वर्षांची झाली जुही चावला, पाहा कधीही न पाहिलेले तिचे Rare Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री जुही चावलाची जुनी छायाचित्रे)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिचा आज 47वा वाढदिवस आहे. 13 नोव्हेंबर 1967 रोजी अंबाला (हरियाणा) येथील आर्मी कुटुंबात जुहीचा जन्म झाला. तिच्या आईचे नाव मोना चावला आणि वडिलांचे नाव डॉ. एस. चावला आहे. जुहीच्या जन्माच्या काही वर्षांनंतर तिचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. जुहीने मुंबईतील सिडेनहम कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. 1984 साली जुहीने मिस इंडियाचा किताब आपल्या नावी केला. याशिवाय 1984 मध्ये पार पडलेल्या मिस युनिव्हर्स या सौंदर्य स्पर्धेत बेस्ट कॉश्च्युमचा अवॉर्ड मिळवला.
'कयामत से कयामत तक' या सिनेमाद्वारे जुहीने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आपल्या पहिल्याच सिनेमासाठी जुहीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे नामांकन मिळाले होते. त्यानंतर तिने 'स्वर्ग', 'आइना', 'लुटेरा' आणि 'हम हैं राही प्यार के' या सिनेमात अभिनय केला. 'हम है राही प्यार के' या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शंभरहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणा-या जुहीचे लग्न बिझनेसमन जय मेहतांसोबत झाले असून तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. जुहीने निर्माती म्हणूनसुद्धा काम केले आहे. 'फिर भी दिल है हिंदुस्थानी', 'चलते चलते' आणि 'अशोका' या सिनेमांची ती निर्माती आहे.
आज जुहीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बघुया तिची काही खास छायाचित्रे...