आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Juhi chawla as spotboy sanjay dutt as a chaiwala

जुहीने धरली छत्री, संजयने वाटला चहा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जुही चावला जर स्‍पॉटबॉय म्‍हणून आणि अभिनेता संजय दत्‍त चहावाला बनून तुमच्‍यासमोर आला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? असेच काहीसे घडले 'सन ऑफ सरदार' या चित्रपटाच्‍या सेटवर.
पावसाळ्याच्‍या दिवसात चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. एके दिवशी क्रू मेंबर्ससह कलाकारांनाही कंटाळा आला होता. दरम्‍यान, संजय दत्‍तच्‍या डोक्‍यात एक कल्‍पना आली. तो लगेच सेटवर उपस्थित असलेल्‍या सर्वांना स्‍वत: चहा बनवून 'कटींग' वाटत फिरू लागला. त्‍याला मदत करण्‍यासाठी जुही चावलाही धावली. संजय पावसात भिजू नये म्‍हणून ती छत्री धरून त्‍याच्‍या मागेमागे फिरत होती.
या दोघांचा हा अवतार पाहून सर्वांना पहिल्‍यांदा आश्‍चर्य वाटले. पण नंतर सर्वांनीच मिळून खूप धमाल केली. काही क्षण चित्रीकरणाचा त्रास विसरून सगळीच मंडळी सुखावली. त्‍यानंतर पुन्‍हा नवीन जोमाने चित्रीकरणास सुरूवात झाली.
पडद्यावरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे कलाकार पडद्यामागे किती मेहनत घेत असतील याचा विचार प्रत्‍येकाच्‍या मनात येत असतो. या दरम्‍यान, स्‍वत:चे मनोरंजन स्‍वत:च करून घेण्‍यातही वेगळीच गंमत असते हे या कलाकारांकडूनच शिकायला हवे.
जुही आणि संजय 1999मधील 'सफारी' या चित्रपटानंतर आताच एकत्र काम करीत आहेत.