आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Gossip: करणच्या पार्टीत पोहोचली नाही खास मैत्रीण करीना, सल्लूसुद्धा होता गायब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पार्टीत सहभागी होण्यासाठी जाताना हृतिक रोशन, सोनम कपूर आणि आलिया भट्ट)
दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला पार्टी साजरी करण्यासाठी कोणत्याही निमित्ताची गरज भासत नाही. जेव्हा इच्छा असेल तेव्हा तो मित्रांसह पार्टी साजरी करत असतो. अलीकडेच त्याने एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बी टाऊनमधील बरेच स्टार्स सहभागी झाले होते.
या पार्टीत अभिनेत्री करिश्मा कपूर सहभागी झाली होती. मात्र लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे करणची जवळची मैत्रीण असलेली करीना कपूर पार्टीत मिसिंग होती.
करीनाच्या अनुपस्थितीवरुन, ती करणवर नाराज तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. कारण करणने त्याच्या आगामी 'शुद्धी' या सिनेमातून करीनाला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. करीनाच्या एकामागून एक आलेल्या फ्लॉप सिनेमांमुळे करणने करीनाला आपल्या सिनेमात कास्ट केले नाही.
मागील काही दिवसांपासून करीना मुंबईतच आपल्या आगामी 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमाचे प्रमोशन करत आहे. यावेळी ती मीडियालासुद्धा भेटत आहे. शहरात असूनदेखील ती करणच्या पार्टीत सहभागी झाली नाही, त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.
करणच्या या पार्टीतून आणखी एक सेलिब्रिटी गायब होता. या सेलिब्रिटीचे नाव आहे सलमान खान. करणच्या पार्टीसोबतच प्री कबड्डी लीगचे आमंत्रण असूनदेखील सलमान तेथे गेला नव्हता. फोटोग्राफर्ससोबत सुरु असलेल्या वादामुळे सलमानने आपल्या मित्राच्या पार्टीत जाणे टाळले. आपल्या उपस्थितीमुळे करणला त्रास होऊ नये, हा त्यामागचा सलमानचा हेतू होता.
या पार्टीत आमिर खान आणि त्याची पत्नी किरण रावसुद्धा उपस्थित होती. मात्र किरण पार्टीतून लवकरच जाणार होती. मात्र करणचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक अयान मुखर्जीच्या म्हणण्यावर ती पार्टीत थांबली. खरं तर आमिरला लेट नाइट पार्टी करणे पसंत आहे, तर किरण नेहमी अशा पार्टीपासून लांब राहते.
असो, ज्या सेलिब्रिटींनी करणच्या पार्टीत हजेरी लावली होती, त्यांनी ती पार्टी मस्त एन्जॉय केली. पुढील स्लाईड्समध्ये पाहा करणच्या पार्टीत सहभागी झालेल्या स्टार्सची खास झलक...