आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कांटे'च्या रिमेकमुळे निर्मात्यांमध्ये फुटले वादाला तोंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन, संजय दत्त, सुनील शेट्टी, महेश मांजरेकर, कुमार गौरव आणि लकी अलीसारख्या अभिनेत्यांचा अभिनीत 'कांटे' सिनेमाचे निर्माते प्रीतिश नंदी आणि संजय गुप्ता यांच्यामध्ये कायदेशीर वाद चालू आहे.
झाले असे, की सिनेमाच्या रिमेकचे अधिकार गुप्ताच्या व्हाइट फेदर फिल्म्स कंपनीने नंदीला न विचारता विकले. दोन्ही निर्मात्यांची सहमती त्यासाठी गरजेची होती. मात्र गुप्ताने तसे केले नाही. आता या वादाने कोर्टाचा मार्ग धरला आहे. सिनेमाचा नफा आणि अधिकारांच्या बदल्यात होणा-या कमाईत नंदी आणि गुप्ता दोघेही हक्क गाजवत आहेत. सिनेमा मात्र तिस-या व्यक्तिमुळे तयार होऊ शकला. संजय दत्तने बच्चन यांच्यासारख्या दिग्गज स्टारला सिनेमा करण्यासाठी तयार केले.
त्याने प्रत्येक वळणावर येणा-या अडचणींपासून सिनेमाला वाचवले. दत्तने सिनेमा पूर्ण करण्यासाठी फायनान्सचे व्यवस्थापन केले. अमिताभ यांनी संजय दत्तमुळे सिनेमा पूर्ण झाल्यानंतर मानधन घेतले.
अमिताभ यांना संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांनी 'रेश्मा आणि शेरा' सिनेमाशी जोडण्याची संधी दिली होती. म्हणून बच्चन यांनी संजय दत्तच्या म्हणण्यावरून वाईट परिस्थितीत सुरू झालेल्या 'कांटे'शी स्वत:ला जोडून घेतले. दत्तच्या मैत्रीमुळे कुमार गौरवचा भावोजी राजू पटेलने अर्थिक कारणांमुळे परदेशात थांबलेल्या शुटिंगसाठी पैशांची मदत केली तेव्हा शुटिंग पूर्ण होऊ शकले. 4 महिन्यांत तयार होणा-या सिनेमाला 14 महिन्यांचा कालावधी लागला.
त्यावेळी गुप्ता आणि दत्त यांच्यात चांगली मैत्री होती. सिनेमाच्या निर्मितीचे ओझे संजय दत्तने वाहिले. तरीदेखील सिनेमाच्या अधिकारांवर त्याने हक्क गाजवला नाही. मात्र सिनेमाचे विभागणी प्रीतिश आणि गुप्ताने आपसात करून घेतली. काही दिवसांनी गुप्ता आणि दत्तच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. त्यावेळी संजय दत्तने 'कांटे' किंवा इतर सिनेमाचे कोणतेही अधिकार मागितले नाहीत. फक्त तो गुप्ताच्या 'अलीबाग' सिनेमामधून वेगळा झाला.
संजय दत्त सध्या तुरूंगात त्याची शिक्षा भोगत आहे. आता 'कांटे'चा रिमेक बनवण्यासाठी येणा-या अडचणींविषयी त्याला काहीच ठाऊक नाहीये. गुप्ताने क्लब लिमिटेड कंपनीला 'कांटे'च्या रिमेकचे अधिकार विकले आहेत. त्यामध्ये 50 टक्के हक्क नंदीचा आहे.
इंडस्ट्रीमध्ये या सिनेमाच्या रिमेककडे एक हिट सिनेमा म्हणून बघितल्या जात आहे. मात्र परिस्थिती सर्व बिघडली आहे. त्यातल्या त्यात ते सोडवण्यासाठी संजय दत्तही नाहीये. प्रकरण कोर्टात गेल्यानंतर रिमेक किंवा सीक्वलच्या शक्यता संपुष्टात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.