आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: मुलीच्या वयापेक्षाही लहान आहे कबीरची चौथी पत्नी, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कबीर बेदी, फिल्म इंडस्ट्रीतील असं नाव आहे, जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. या व्यक्तिने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही. कबीर आज 69वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याने मॉडेलिंगमधून आपल्या करिअरला सुरुवात केली.
दिसायला चांगला असलेल्या मलिक कबीर गतकाळातील सुंदर महिलांना आकर्षित करण्यात नेहमी यशस्वी ठरला. कबीर बेदी आपल्या 4 लग्नाने आणि अफेअर्सनी नेहमी चर्चेत राहिला आहे.
परवीन बाबीसोबत होते अफेअर-
कबीरचे पहिले लग्न डान्सर प्रोतिमा बेदीसोबत झाले होते, दोघांना मुलगी पूजा आणि मुलगा सिध्दार्थ ही दोन मुले आहेत. कबीरचा मुलगा शिजोफ्रिनिया नावाच्या आजाराने त्रस्त होता आणि 1997मध्ये त्याने आत्महत्या केली. प्रोतिमापासून घटस्फोट घेतल्यानंतर कबीर जवळपास तीन वर्षे परवीन बाबीसोबत नात्यात आणि लिव्ह-इनमध्ये होता. दोघांच्या अफेअरने बरीच चर्चा एकवटली होती. मात्र, कबीर यांनी परवीनसोबत लग्न केले नाही. त्यांनी दुसरे लग्न ब्रिटीश फॅशन डिझाइनर सुसैन हम्फ्रेससोबत केले. दोघांना एक मुलगा एडम बेदी आहे, तो एक इंटरनॅशनल मॉडेल आहे. एडम 'हॅलो कौन है?'मधून बॉलिवूडमध्ये आला होता. कबीरच्या दुस-या लग्नाचाही अंत घटस्फोटाने झाला.
रेडिओ प्रेझेंटरसोबत केले तिसरे लग्न-
1990च्या दशकात कबीरने तिसरे लग्न टीव्ही आणि रेडिओ प्रेझेंटर निक्कीसोबत केले आणि 2005मध्ये दोघांचे नाते संपुष्टात आले. दोघांना एकही आपत्य नाहीये. त्यानंतर कबीर ब्रिटीश अभिनेत्री आणि मॉडेल परवीन दुसांजसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले. दोघांचे लग्ने झाले. विशेष म्हणजे, कबीर यांची चौथी पत्नी परवीन (वय जवळपास, 40) त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा (44 वय) चार वर्षांनी लहान आहे.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत-
हॉलिवूडमध्ये अभिनेता कबीर बेदीच्या करिअरची सुरुवात ओ पी रलहानच्या 'हलचल'मधून झाली होती. परंतु त्याला ओळख आणि पैसा यूरोपच्या प्रसिध्द मिनी सीरीज सँडोकनमध्ये काम केल्यानंतर मिळाली. त्याने बाँडच्या 'ऑक्टोपसी'मध्ये मुख्य खलनायकाचे पात्र साकारले. सोबतच, त्याने प्रसिध्द टीव्ही शो 'ओपरा'मध्येसुध्दा काम केले. त्याच्या करिअर आणि लाइफस्टाइलचे भारतीय शैलीशी काहीही कनेक्शन नसते. लिव्ह-इन-रिलेशनशिप, अफेअर्स, शानदार लग्ने आणि लगेच घटस्फोट, हे उतार-चढ त्याच्या आयुष्याचा नेहमीच एक भाग राहिले आहेत. परंतु हे उतार-चढसुध्दा त्याच्या अफेअर आणि यशस्वीसाठी कधीच आडकाठी म्हणून आले नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कबीर बेदी आणि परवीन दुसांजची काही छायाचित्रे...