मुंबई: कबीर खानच्या 'फँटम' या आमागी सिनेमाच्या शूटिंगची काही छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांमध्ये मुख्य भूमिका साकारणारे कलाकार कतरिना कैफ आणि
सैफ अली खानसुध्दा दिसत आहे. सिनेमाचे शूटिंग रात्रीच्यावेळी चालू आहे.
सध्या सैफ अली खान आणि कतरिना कैफ तिच्या 'फँटम' सिनेमाच्या शूटिंग उरकण्याच्या मागे
आहे. 'फँटम'ला भारतातील विविध ठिकाणांसह परदेशातल्या लोकेशनवरसुध्दा शूट करण्यात येत आहे. हा सिनेमा 'एक था टायगर' आणि 'न्यूयॉर्क' फेम दिग्दर्शक कबीर खान दिग्दर्शित करत आहे.
'फँटम'ची जी छायाचित्रे समोर आली आहेत, त्यामध्ये सैफ अली खान ब्राउन पठाणी कुर्त्यामध्ये दिसत आहे. तसेच, कतरिनाने सूट परिधान केलेला दिसतो. शूटिंगचे हे छायाचित्र एका बोटीच्या आणि कोस्टल एरियाच्या जवळचे आहे. काही छायाचित्रात सैफचा मेकअप केला जात आहे, तर काहीमध्ये कबीर खान सैफ आणि कतरिना कैफला सीन समजवताना दिसतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाच्या शूटिंगचे Inside Pics...