आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलचा BOLD अवतार तुम्ही यापूर्वी पाहिला आहे का?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - अभिनेत्री काजोल)

5 ऑगस्ट 1972 रोजी जन्मलेल्या काजोलचा आज 40वा वाढदिवस आहे. काजोल अभिनेत्री तनुजा आणि दिग्दर्शक शोमू मुखर्जी यांची मुलगी आहे.
'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' यांसाख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेल्या काजोलने वयाच्या सोळाव्या वर्षी आपले शालेय शिक्षण अर्धवट सोडून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. 1992 साली रिलीज झालेला 'बेखुदी' हा काजोलचा पहिला सिनेमा होता.
मात्र काजोलला खरे यश मिळाले ते 1993 साली रिलीज झालेल्या 'बाजीगर' सिनेमामुळे. सिनेमात काजोल अभिनेता शाहरुख खानबरोबर झळकली होती. शाहरुख आणि काजोलच्या जोडीला रुपेरी पडद्यावरील हिट जोडी समजली जाते.
1997 साली रिलीज झालेल्या 'गुप्त' आणि 1998च्या 'दुश्मन' सिनेमातील भूमिकेसाठी काजोलचे कौतुक झाले होते. आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात काजोलनेही भरपूर एक्सपोज केले होते. 'बाजीगर' या सिनेमात काजोलने बिकिनी परिधान केली होती.
एक नजर टाकुया काजोलच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील काही खास छायाचित्रांवर. या छायाचित्रांमध्ये काजोल एक्सपोज करताना दिसत आहे...