आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही मुलांसह असा वेळ घालवते काजोल, पाहा UNSEEN PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'बाजीगर', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' यांसाख्या सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली अभिनेत्री काजोल हिचा आज (5 ऑगस्ट) वाढदिवस आहे. शालेय शिक्षण घेत असताना तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली होती. 1992 साली 'बेखुदी' या सिनेमाद्वारे काजोलने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.
अभिनय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करण्यासाठी काजोलने शिक्षण अर्धवट सोडले. काजोलचा पहिला सुपरहिट सिनेमा म्हणजे 1993 साली रिलीज झालेला 'बाजीगर'. या सिनेमात काजोल अभिनेता शाहरुख खानबरोबर झळकली होती. शाहरुख आणि काजोलच्या जोडीला रुपेरी पडद्यावरील हिट जोडी समजली जाते.
1997 साली रिलीज झालेल्या 'गुप्त' आणि 1998च्या 'दुश्मन' सिनेमातील भूमिकेसाठी काजोलचे कौतुक झाले होते. काजोलने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणबरोबर 1994 साली डेटिंग सुरु केले आणि 24 फेब्रुवारी 1999 रोजी महाराष्ट्रीय पद्धतीने ती अजयबरोबर विवाहबद्ध झाली.
चांगली अभिनेत्री असण्याबरोबरच काजोल एक चांगली पत्नी आणि आईसुद्धा आहे. अजयबरोबर लग्न झाल्यानंतर 2003 साली काजोलने मुलीला जन्म दिला. तिचे नाव न्यासा असे आहे. 2010 साली काजोलच्या घरात आणखी एका नव्या पाहुण्याचे आगमन झाले. काजोल आणि अजयने आपल्या मुलाचे नाव युग असे ठेवले.
सध्या काजोलने फिल्मी इंडस्ट्रीपासून स्वतःला दूर ठेवले आहे आणि ती आपला हा वेळ सामाजिय कार्याला देत आहे. विधवा आणि मुलांसाठी समाजकार्य करणा-या एक एनजीओसाठी काजोल काम करत आहे. 2008 साली या कार्यासाठी तिला कर्मवीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सोशल वर्कशिवाय काजोल आपला सगळा वेळ आपल्या मुलांबरोबर घालवते.
एक नजर टाकुया काजोलच्या फॅमिलीच्या काही न बघितलेल्या छायाचित्रांवर...