आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol Devgan Family Members And PhotosKajol Devgan Family Members And Photos

B'day: आजोबा, वडिलांपासून ते बहीणभावंडांपर्यंत, भेटा काजोलच्या माहेरच्या सदस्यांना...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो - वडील शोमू मुखर्जी यांच्यासह काजोल आणि तनिषा मुखर्जी)
बॉलिवूड अभिनेत्री काजोलने आज वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. तिचा जन्म 5 ऑगस्ट 1974 रोजी मुखर्जी कुटुंबात झाला होता. मुखर्जी कुटुंबाच्या अनेक पिढ्या बॉलिवूडमध्ये कार्यरत आहेत. काजोलचे वडील शोमू मुखर्जी बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक होते. तर आई तनुजा समर्थ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. मुखर्जी कुटुंबाच्या तीन आणि समर्थ कुटुंबाच्या चार पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
काजोलच्या बालपणीच तिचे आईवडील विभक्त झाले होते. तनुजा यांनी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे, त्यांनी आणि शोमू यांनी आपल्या नात्यामध्ये आलेल्या दुराव्याचा परिणाम कधीच मुलींवर होऊ दिला नाही. मुलांसमोर ते सामान्य राहायचे. काजोल आणि तनिषा बोर्डिंग स्कूलमध्ये शिकले. मात्र दर महिन्याला त्या आपल्या आईवडिलांना भेटायला यायच्या.
एप्रिल 2008 मध्ये शोमू मुखर्जी यांचे निधन झाले.
बहीण तनिषासुद्धा बॉलिवूडमध्ये कार्यरत...
काजोलच्या धाकट्या बहिणीचे नाव तनिषा असून तीनेही आपले नशीब बॉलिवूडमध्ये आजमावले होते. मात्र काजोलप्रमाणे तिच्या वाट्याला यश आले नाही. गेल्यावर्षी बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये ती सहभागी झाली होती.
काजोलचे वडील शोमू मुखर्जी यांचे कुटुंब...
- काजोलचे वडील शोमू मुखर्जी शशधर मुखर्जी आणि सती रानी देवी यांचे सर्वात छोटे पुत्र होते.
- शशधर मुखर्जी यांचे लग्न सती रानी देवी यांच्यासोबत झाले होते. सती रानी देवी अशोक कुमार, किशोर कुमार आणि अनुप कुमार यांची एकुलती एक बहीण होती.
- शशधर मुखर्जी यांना एकुण चार मुले होती. रोनो मुखर्जी, जॉय मुखर्जी, देब मुखर्जी आणि शोमू मुखर्जी (काजोलचे वडील) ही त्यांच्या मुलांची नावे.
- काजोलची चुलत बहीण आणि रोनो मुखर्जी यांची मुलगी शरबानी मुखर्जी आहे. शरबानीसुद्धा बॉलिवूड अभिनेत्री होती.
- प्रसिद्ध दिग्दर्शक अयान मुखर्जीसुद्धा काजोलचा चुलत भाऊ आहे. तो देब मुखर्जी यांचा मुलगा आहे.
- अभिनेत्री राणी मुखर्जीसुद्धा काजोलची चुलत बहीण आहे. राणी शशधर मुखर्जी (काजोलचे आजोबा) यांचे मोठे भाऊ रवींद्र मोहन यांचा मुलगा राम मुखर्जी यांची मुलगी आहे. राणीला एक भाऊ असून त्याचे नाव राजा मुखर्जी आहे.
काजोलचे फिल्म इंडस्ट्रीपासून दूर राहिलेले नातेवाईक...
काजोलचे काका जॉय मुखर्जी यांची तिन्ही मुले (दोन मुले आणि एक मुलगी) फिल्म इंडस्ट्रीपासून लांब राहिले. तर नूतन यांच्याव्यतिरिक्त काजोलची आणखी एक मावशी आहे. त्यांचे नाव चतुरा असून त्यादेखील फिल्म इंडस्ट्रीकडे वळल्या नाहीत. चतुरा यांची लेक रेशमासुद्धा आपल्या आईप्रमाणे सिनेमांपासून दुर राहिली.
पती अजय देवगणचे कुटुंब..
काजोलचे लग्न बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसह झाले आहे. अजयचे वडील प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक होते, तर आई वीणा निर्मात्या होत्या. अजयचे भाऊ अनिल देवगण दिग्दर्शक आहेत. जीत, जान, इतिहास, प्यार तो होना ही था या सिनेमांचे अनिल सहायक दिग्दर्शक तर राजू चाचा, ब्लॅकमेल या सिनेमांचे दिग्दर्शक होते.
मुलगी न्यासा आणि मुलगा युग...
काजोल आणि अजय देवगणला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगी न्यासाचा जन्म 20 एप्रिल 2003 रोजी झाला, तर मुलगा युगचा जन्म 13 सप्टेंबर 2010 रोजी झाला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा काजोलची तिच्या माहेरच्या मंडळींसोबतची खास छायाचित्रे...