आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोल-करणच्या मैत्रीत अजयमुळे आला दुरावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - अजय देवगण, काजोल आणि करण जोहर)

बॉलिवूडमधील सर्वात जवळचे मित्र म्हणून ओळख असलेल्या जोडीमध्ये काजोल आणि करण जोहरचे नाव प्रामुख्याने घेतले जात होते. मात्र, सध्या हे दोघे एकदुसर्‍याचे नावदेखील घेऊ इच्छित नाहीत. दोघेही 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'पासून जिवलग मित्र आहेत. करणचा 'कुछ कुछ होता है' याच कारणामुळे काजोलने केला होता. काजोलला एका मुलाखतीत करणविषयी विचारण्यात आले असता तिने 'नो कॉमेंट्स' म्हणत करणचा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
काजोलच्या या वागण्यामागे तिचा पती अजय कारणीभूत असल्याचे कळते.
सूत्राने सांगितले की, अजय -करण यांच्यात वाद झाला होता. यामध्ये काजोलला पतीचीच बाजू घ्यावी लागली. जेव्हा करणने आपल्याबद्दल अपशब्द वापरले असल्याचे अजयला एका व्यक्तीकडून कळाले, तेव्हा तो नाराज झाला. त्या वेळी अजयने करणला फोन करून माझ्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल यापुढे काहीही न बोलण्याचे स्पष्ट शब्दांत सुनावले. करणने मात्र आपण अजयबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल अपशब्द वापरले नसल्याचे सांगितले. तरीही दोघांमधील वाद वाढतच गेला आणि तेव्हापासून करणनेदेखील काजोलशी असलेले मैत्रीचे नाते तोडले.