आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol Might Make Comback With Ajay Devgan's Film

अजयच्याच सिनेमातून कमबॅक करणार काजोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: काजोल 'वी और फॅमिली' या सिनेमानंतर दिसली नाही. तेव्हापासून ती एका चांगल्या पटकथेच्या शोधात आहे. आता बातमी अशी आहे, की ती अजय देवगणच्या आगामी सिनेमातून कमबॅक करू शकते.
अजयच्या या सिनेमात अँडेमॉल सह-निर्माता आहे. जाहिरात पुरस्कार विजेते दिग्दर्शक राम माधवानी सिनेमाचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांचा 'लेट्स टॉक' हा मागील सिनेमा होता.
एका सूत्राने सांगितले, 'राम यांना 20पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी पुरस्कृत जाहिराती तर तयार केल्याच सोबतच स्टार्ससह कामही केले आहे. त्यांनी अमिताभ बच्चनसह एव्हरलास्टिंग लाइट नावाचा एक डॉक्युमेंट्री सिनेमा बनवला होता.'
आमिर खानच्या 'तारे जमीन पर' सिनेमाच्या 'भेजा कम' गाण्याचे, सत्यमेव जयतेच्या (2012) थीम साँगचे दिग्दर्शनसुध्दा त्यांनी केले. सुरुवातीला तो आमिरच्या बॅनरकडेच एक पटकथा घेऊन गेला होता. परंतु तिथे खूप वेळ लागणार होता.
आता त्यांनी अजयशी संपर्क साधला असून त्याने याची निर्मिती काजोलसाठी करण्याची कल्पना सुचवली आहे.