आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काजोलचा सिनेमा ऑक्टोबरपासून सुरू होणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वी आर फॅमिली’नंतर काजोलचा हा पहिलाच सिनेमा आहे.
सिनेमाचे दिग्दर्शक राम माधवानी यांनी सांगितले की, ‘आम्ही ऑक्टोबरपासून सिनेमाच्या चित्रीकरणाचे शेड्यूल सुरू करत आहोत.’ सिनेमामध्ये काम करण्यासाठी काजोलने होकार दिल्याबद्दल राम म्हणाले की, ‘अनेक वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो.
अनेक जाहिरातींचे शुटिंगही सोबत केली आहे. यादरम्यान आमच्यामध्ये विश्वासाचे नाते तयार झाले असून एकमेकांचा आम्ही आदरदेखील करतो. मी जेव्हा तिच्याकडे या सिनेमाचा विषय घेऊन गेलो, त्यावेळी तिने मला होकार कळवला.’
या सिनेमाची निर्मिती काजोलचा पती अजय देवगण करणार आहे. या सिनेमाचे शेड्यूल काजोलच्या घरातील जबाबदार्‍यांचा विचार करूनच आखण्यात आले आहे. हा सिनेमा एका गृहिणीच्या बाबतीत असून ती स्वत:ची ओळख शोधण्याचा प्रयत्न करत असते. वास्तविक हा सिनेमा प्रासंगिक विषयावर आधारित आहे. मात्र, अत्यंत गमतीशीर पद्धतीने या विषयाची मांडणी सिनेमामध्ये करण्यात येणार आहे.