आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता काजोलही मराठी चित्रपटांकडे वळणार...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या दोन महिन्यांमध्ये हिंदी चित्रपटांचे दिग्गज कलावंत पाठोपाठ मराठी चित्रपटसृष्टीशी जोडले जात आहेत. अक्षय कुमारच्या ‘72 मैल : एक प्रवास’ या चित्रपटानेही खूप प्रशंसा मिळवली. सलमान खान त्याचा मित्र महेश मांजरेकरांसाठी एका मराठी चित्रपटात पाहुण्या कलावंताची भूमिका करत आहे. विद्या बालन कपूरदेखील लवकरच एका मोठ्या मराठी निर्मात्यासोबत चित्रपटाची घोषणा करणार आहे.
उर्मिला मातोंडकरने आपले अॅक्टिंग करिअर अबाधित ठेवण्यासाठी मराठी चित्रपटात काम करण्यास सुरुवातही केली आहे. 90 च्या दशकातील हिंदी चित्रपट अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने हिंदी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले. मात्र, तिने प्रॉडक्शन हाऊस मराठीतच उघडले. आता काजोलनेदेखील मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तिची छोटी बहीण तनीषा निर्माती अश्विनी यार्दीच्या मराठी चित्रपटात काम करत आहे. हा एनआरआय चित्रपट असून पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये होत आहे.
2009 मधील ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’ या महेश मांजरेकरांच्या चित्रपटाने मराठी सिनेमामध्ये चांगला बदल घडवून आणला. व्यावसायिक तज्ज्ञ या बदलामागे तीन कारणे असल्याचे सांगतात. पहिले म्हणजे मराठी प्रेक्षक आता मल्टिप्लेक्समध्ये जात आहेत. दुसरे, महाराष्ट्र सरकारच्या नियमानुसार प्रत्येक मल्टिप्लेक्समध्ये वर्षातून 30 दिवस मराठी चित्रपट प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. तिसरे कारण आता मराठी चित्रपट बोल्ड विषयांवर बनत आहेत. तज्ज्ञांच्या मते, काजोल आणि विद्या बालन मराठी चित्रपटांशी जोडल्या गेल्याने महाराष्ट्र सर्किटमध्ये हिंदी चित्रपटांना मराठी चित्रपट चांगलीच टक्कर देऊ शकतात.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या मराठीतील सध्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कितींची कमाई केली...