आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kajol With Mother, Sisiter And Kids At Durga Puja Festival In Juhu

PICS: काजोलने मुलांसोबत घेतले दुर्गा मातेचे दर्शन, इतर सेलेब्सही पोहोचले दर्शनाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मुलगा युग आणि मुलगी न्यासासोबत काजोल)
मुंबईः अभिनेत्री काजोल देवगण गुरुवारी दुर्गा पूजेत सहभागी झाली होती. मुंबईतील जुहूस्थित दुर्गा पंडालमध्ये काजोलने दुर्गा मातेची पूजाअर्चा केली. यावेळी तिच्यासोबत मुलगा युग, मुलगी न्यासा आणि कुटुंबातील इतर सदस्य हजर होते.
मुखर्जी कुटुंबातर्फे दरवर्षी नवरात्रौत्सव पूजेचे आयोजन केले जाते. यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी होत असतात. काजोल या पूजेत ट्रेडिशनल लूकमध्ये सहभागी झाली होती. तिने पिवळ्या रंगाची साडी आणि गळ्यात सोन्याचा हार आणि कंगन घालते होते. काजोलची मुलगी न्यासा कॅज्युअल लूकमध्ये दिसली.
या दुर्गा पूजेत काजोलची आई तनुजा, बहीण तनिषा आणि चुलत बहीण शिरबानी मुखर्जी सहभागी झाल्या होत्या. बुधवारी याच ठिकाणी अभिनेत्री राणी मुखर्जी हिनेसुद्धा दुर्गा मातेचे दर्शन घेतले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा दुर्गा पंडालमध्ये क्लिक झालेली ही खास छायाचित्रे...