(रिचा चड्ढासोबत सोनू निगम आणि कल्कि कोचलिन)
मुंबई: अभिनेत्री रिचा चड्ढाचा 'तमंचे' सिनेमा आज (10 ऑक्टोबर) रुपेरी पडद्यावर झळकत आहे. सिनेमाच्या तिच्यासोबत निखिल द्विवेदीने काम केले आहे. रिचाने बुधवारी (8 ऑक्टोबर) सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवले होते.
या स्क्रिनिंगमध्ये बॉलिवूडचे अनेक सेलेब्स दिसले. स्क्रिनिंगमध्ये सामील होणा-यांमध्ये सेलेब्समध्ये गायक सोनू निगमसुध्दा सामील झाला होता. सोनू दिर्घकाळानंतर एखाद्या स्क्रिनिंगमध्ये सामील झाला आहे. त्याच्यासह अभिनेत्री कल्कि कोचलिनसुध्दा या स्क्रिनिंगमध्ये दिसली. कल्किने पांढरा टॉप आणि काळ्या रंगाचा लाँग शर्टच्या गेटअपमध्ये दिसली. यावेळी स्क्रिनिंग होस्ट करणारी रिचासुध्दा ग्लॅमरस लुकमध्ये दिसली. तिने काळ्या रंगाचा फ्लोअर शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. स्क्रिनिंगमध्ये निर्माता रमेश तौराणी, अली फजल आणि अभिनेता गुलशन देवरियासुध्दा दिसले.
'तमंचे' लव्हस्टोरीवर आधारित सिनेमा आहे. या सिनेमात रिचाच्या पात्राचे नाव 'बाबू' असून निखिल 'मुन्ना'च्या भूमिकेत आहे. सिनेमा नवनीत बहल यांनी दिग्दर्शन केले असून सूर्यवीर सिंह भुल्लरने निर्मित केला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'तमंचे'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...