आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kalkie And Anurag Kashyap News In Marathi, Bollywood

कल्की आणि मी चांगले मित्र; अनुराग कश्यपचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- पत्नी कल्की कोचलिनपासून विभक्त झालो असलो तरी आम्ही अजूनही चांगले मित्र आहोत, असे मत निर्माता व दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केले.

कल्की व अनुराग यांनी 2011 मध्ये विवाह केला होता. मात्र, अवघ्या दोनच वर्षांत त्यांच्यात मतभेद झाल्याने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. काही काळ त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला होता. मात्र, काही दिवसांनंतर त्यांनी विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. अनुराग म्हणाला, आम्ही दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहोत. त्यामुळे आमची मतेही वेगळी असू शकतात. आम्ही विभक्त झालो असलो तरी चांगले मित्र आहोत.

यापुढेही आमचे मैत्रीपूर्ण संबंध राहतील. 2009 मध्ये अनुराग व कल्की यांनी ‘देव डी’ हा चित्रपट केला होता. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. दोन वर्षांनंतर त्यांनी 2011 मध्ये विवाह केला. अनुराग त्याची सहदिग्दर्शिका साब्रिना खान हिच्यासोबत डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर कल्कीनेही विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.