आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमाल खानला आता भारताचे वेध, पब्लिसिटी स्टंट संपला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
16 मे 2014 ला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा विजय झाला आणि त्यांच्या विरोधी गटात असलेल्या लोकांची बोलती बंद झाली. मोदींच्या यांच्या विरोधी गटात वादग्रस्त अभिनेता कमाल राशिद खानच्याही नावाचा समावेश होता. नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, हे लोकसभा निवडणूक निकालातून स्पष्ट झाल्यानंतर, आधी जाहीर केल्याप्रमाणे भारत सोडून पाकिस्तानात गेलेला कमाल खान पुन्हा भारतात परत येतोय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांचे राजकीय सल्लागार अमरनाथ मिश्रा यांच्या आवाहनावरून आपण मायदेशी परतत असल्याचं स्वतः कमाल खाननेच ट्विटरवरून सांगितले आहे.
कमाल राशिद खानने ट्विट केले, ''Amarnath Mishra political advisor of Rajnath Singh Ji called n asked me to come back to India so I will come back tomorrow or day after.''
राजनाथ सिंह यांचे राजकीय सल्लागार अमरनाथ मिश्रा यांनी आपल्याला फोन करून भारतात परतण्याचं आवाहन केलंय, त्यांचे हे बोलावणे मान्य करून आपण उद्या किंवा परवा भारतात येतोय, असे त्याने म्हटले आहे.
कमाल खानने निवडणुकीआधी, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास आपण देश सोडून जाऊ, असे ट्विटरवरुन जाहीर केले होते. त्यामुळे मोदींकडे पंतप्रधान पद येणार म्हटल्यावर त्याने आपला शब्द पाळत देश सोडून जात असल्याचे ट्विटरवरुन सांगितले. शोएब अख्तरसोबतचा विमानातला एक फोटो ट्विट करून त्यानं 'बाय बाय इंडिया' म्हटलं होतं. परंतु आता तो पुन्हा भारतात येतोय. त्यामुळे आता त्याचा मोदीद्वेष आणि प्रसिद्धीझोतात राहण्याचा स्टंट संपुष्टात आला का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा केआरकेने भारतात परत येण्याच्या निमित्ताने आणि मोदींविरोधात कोणकोणत ट्विट केले...