आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'DAY: 60 वर्षांचे झाले कमल हासन, पाहा त्यांचे वेगवेगळे LOOKS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेते कमल हासन)

अभिनेते, दिग्दर्शक, लेखक आणि डान्सर कमल हासन यांनी आज वयाची 60 वर्षे पूर्ण केली आहेत. 7 नोव्हेंबर 1954 रोजी परमकुडी, चेन्नई येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा कॅमेरा फेस केला. ए. भीमसिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या 'कलत्तूर कन्नम्मा' या सिनेमाद्वारे ते पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकले.
कमल हासन यांनी अनेक तामिळ सिनेमांमध्ये अभिनय केला आणि अनेक पुरस्कार आपल्या नावी केले. बॉलिवूडमध्ये त्यांनी 'एक दुजे के लिए' या सिनेमाद्वारे एन्ट्री घेतली. हा सिनेमा हिट ठरला. त्यानंतर 'सागर', 'गिरफ्तार', 'जरा सी जिंदगी', 'राज तिलक', 'एक नई पहेली', 'देखा प्यार तुम्हारा', 'चाची 420', 'हे राम', 'विश्वरूपम्' अनेक हिंदी सिनेमात आपली छाप सोडली.

कमल हासन यांचे पहिले लग्न दाक्षिणात्य अभिनेत्री वाणी गणपतीसोबत झाले होते. मात्र दहा वर्षांतच त्यांचा संसार मोडला. अभिनेत्री सारिकासोबत त्यांनी दुसरे लग्न केले. 1988 मध्ये त्यांनी लग्न केले आणि 2002 मध्ये त्यांचा घटस्फोटसुद्धा झाला. या दाम्पत्याला दोन मुली असून श्रुती आणि अक्षरा ही त्यांची नावे आहेत. 2014 मध्ये कमल यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन सन्मानित केले.
आज कमल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांची विविध रुपे छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत. यामध्ये त्यांच्या बालपणापासून ते आत्तापर्यंतच्या छायाचित्रांचा समावेश आहे.