आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज नाही.. मला खान गटाची

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कंगनाचे खासगी आयुष्य आणि करिअर बर्‍यापैकी स्थिर झाले आहे. ‘गँगस्टर’ चित्रपटापासून सुरुवात करणार्‍या कंगनाने सहा वर्षांत बॉलिवूडमध्ये आपली जागा सुरक्षित केली आहे. कंगना सध्या दुबईत आहे. ती सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये मुंबई हीरोज टीमची ब्रँड अँम्बेसेडर आहे.
सोहेल खानच्या क्रिकेट टीमची ब्रँड अँम्बेसेडर बनल्यावर ती आता सलमान खान कॅम्पमध्ये सामील झाली आहे का? या प्रश्नावर ती म्हणते, अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत मी आपली जागा कमावली आहे. येथे टिकून राहण्यासाठी मला खान किंवा कोणत्याही गटाची गरज पडणार नाही. काम मिळवण्यासाठी खान गटात जाणार्‍या अभिनेत्रींचीही मला भीती वाटत नाही. अशा नायिकांना येथे चांगले मित्रसुद्धा मिळत नाहीत. मला येथे माझ्या प्रतिभेमुळे चित्रपट मिळतात, कुणाच्या मैत्रीमुळे नाही.'
इंडस्ट्रीत चांगले मित्र आहेत, हे माझे नशीब. सलमान खान, हृतिक रोशन, रितेश देशमुख, मधुर भांडारकरसोबत माझी चांगली मैत्री आहे; पण हे मित्र ते नाहीत ज्यांच्याशी मी रात्री उशिरापर्यंत बोलू शकते. माझ्या समस्या मी स्वत:च सोडवते. यासाठी मी कोणत्याही मित्राची मदत घेत नाही. आपल्या फायद्यासाठी त्यांचा उपयोग करणे मला आवडत नाही.